सरकारने चाकरमान्यांसाठी योग्य ते नियोजन करावे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे प्रवीण भोसलेंनी निवेदनद्वारे वेधले लक्ष.. चाकरमान्यांसाठी योग्य ते नियोजन करावे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनद्वारे मागणी..
⚡सावंतवाडी ता.०५-: मुंबई ते कोकण या दोन्ही महामार्गाची परिस्थिती वाईट आहे.रस्त्यावर खड्डे आहेत. अनेक ठिकाणी ब्रिजची काम चालू आहेत, त्यामुळे चतुर्थीपूर्वी चाकरमान्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी योग्य ते नियोजन करावे अशी मागणी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.