नांदगाव येथील एकजण जखमी:अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविले..
कणकवली : मुंबई – गोवा महामार्गाव नांदगाव येथ एक्टिवा दुचाकी ला खाजगी ट्रॅव्हलरची धडक बसून अपघात झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ७:३० वा. च्या सुमारास घडली. यामध्ये नांदगाव सिसयेवाडी येथील विनोद दिवाकर मोरये हे जखमी झाले आहेत. याबाबत संतोष शिवा बिडये ( वय ४९ रा. नांदगाव बिडयेवाडी ) यांनी कणकवली पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चालकवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संतोष शिवा बिडये हे मुंबई – गोवा महामार्गावर मॉर्निग वॉकिंग साठी मुंबईच्या दिशेने गेले होते. पुन्हा गोव्याच्या दिशेने येत असताना मुंबई – गोवा हायवेवर नांदगाव बिडयेवाडी नजिक १५० मी. अंतरावर ( एमएच १२ टीव्ही २३४६ ) क्रमांकाच्या खाजगी ट्रॅव्हलरने समोर चालणाऱ्या ऍक्टिव्हा ( एमएच ०७ एपी ९०२५ ) ला मागून धडक दिली. याधकेत नांदगाव सिसयेवाडी येथील विनोद दिवाकर मोरये ( वय ३१, नांदगाव सिसयेवाडी ) हे जखमी झाले. जखमी विनोद मोरये यांना तातडीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र तेथूनही विनोद मोरये यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले.
या अपघात प्रकरणी खाजगी ट्रॅव्हलर चालक महेश शंकर राठोड ( वय २८ रा. कर्नाटक बेळगाव ) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे करत आहेत.