*💫सावंतवाडी दि.१२-:* आज घारपी येथे घाटात एसटी बस कोसळून झालेल्या अपघातात जख्मी झालेल्या विद्यार्थी व अन्य प्रवासी अशा ११ जणांवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, या अपघातात जख्मी झालेल्या विद्यार्थी व अन्य प्रवासी यांची सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे. तसेच त्याच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांशी देखील त्यांनी यावेळी उपचारबाबत विचारपूस केली आहे. यावेळी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक मनोज नाईक, बंटी पुरोहित आदी पदाधिकारी उपस्थित होते.
घारपी अपघातात जख्मी झालेल्या विद्यार्थी व प्रवाशांची नगराध्यक्ष संजू परब यांनी केली विचारपूस
