कुडाळ जिजामाता चौक येथील राजमाता जिजाऊ माँसाहेब नूतन स्मारकाचा अनावरण सोहळा संपन्न!

कुडाळचे प्रतिष्ठित नागरिक श्री. देवदत्त रमाकांत नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण!

*💫कुडाळ दि.१२-:* शहरातील जिजामाता चौक येथील नूतन राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा आज जिजामाता जयंतीच्यादिवशी उत्साहात संपन्न झाला. कुडाळ येथील ज्येष्ठ नागरिक श्री. देवदत्त रमाकांत नाडकर्णी यांच्या हस्ते स्मारकाचे अनावरण करण्यात आले. शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने सदर स्मारकाच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. आजच्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहिले होते. यावेळी नूतन स्मारकासाठी परिश्रम घेतलेल्या शिवप्रेमींचा सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page