मालवणात श्रावण या विषयास अनुसरून भव्य “रिल मेकींग” स्पर्धेचे आयोजन…!

⚡मालवण,ता.०३-: सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या वतीने पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी श्रावण- पर्यटन पर्वणी अर्थात मालवणातील श्रावण या विषयास अनुसरून भव्य “रिल मेकींग” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी रिलची मर्यादा कमाल ९० सेकंद (दिड मिनीट) आहे. मालवण तालुक्याच्या पावसाळी पर्यटनाशी निगडीत कोणत्याही विषयाचे रिल बनवू शकता. (उदा. श्रावणातील उत्सव, निसर्ग, पशुपक्षी, किटक, समुद्र, ट्रेक, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, व्यापार किंवा अन्य काहीही.) रिलच्या संवादात किंवा चित्रिकरणात पार्शभूमीवर सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ असा उल्लेख असणे अनिवार्य आहे. स्पर्धकांनी

malvan_vyapari_sangh या इन्स्टापेजवर आपले रिल २३ ऑगस्ट रात्री ११.५९ वाजेपर्यंत कोलॅब करणे आवश्यक आहे. कोलॅब केलेले रिल स्पर्धेत स्विकारायचे किंवा नाही याचे अधिकार आयोजकांकडे राखीव असतील. कोलॅब केलेले रिल आयोजकांनी स्विकारल्या नंतरच या स्पर्धेसाठी स्पर्धकाचा प्रवेश निश्चित होईल. अश्लिल किंवा असंवेदनशील रिल स्विकारले जाणार नाहीत. फॉलोअर्स, लाईक्स, कॉमेंट्स याला अंतिम निकालात फक्त ५ टक्के भारमान (वेटेज) देण्यात येईल. रिल मध्ये दिलेला विषय कशाप्रकारे मांडला आहे, किती परिणामकारकरित्या मांडला आहे व किती कलात्मक परिणाम साधला आहे याला अंतिम मुल्यांकनात अधिकचे भारमान (वेटेज) असेल.

स्पर्धेतील विजेत्यास अनुक्रमे १ रुपये, सन्मानचिन्ह, ३ हजार रु गर रुपये, सन्मानचिन्ह, न्मानचिन्ह, उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी १ हजार रुपये. सन्मानचिन्ह तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

स्पर्धेचे परिक्षण मंडळ स्वतंत्र असेल व त्यात आयोजकांचा कोणीही प्रतिनिधी असणार नाही. परिक्षक मंडळाने दिलेला निर्णय अंतिम असेल व त्याबद्दल कोणतीही तक्रार मान्य केली जाणार नाही. अधिक माहितीसाठी हर्षल बांदेकर- ९४०४४४२९५५, लारा मयेकर- ९४२३२१५४४४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मालवण व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page