सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर सावंत यांचे निधन…!

⚡कुडाळ ता.०३-: मुळचे नाटळ (राजवाडी) येथील व सध्या वेंगुर्ला तालुक्यातील आडेली कामळेवीरवाडी येथे स्थायिक झालेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर महादेव सावंत (वय- ९३) यांचे शनिवार दिनांक २ ऑगस्ट रोजी निधन झाले. आडेली कामळेवीरवाडी येथील डॉ. हेमंत सावंत यांचे ते वडील तर डॉ. सौ . स्मिता सावंत यांचे ते सासरे होत. प्रभाकर सावंत यांनी कणकवली तालुक्यात अनेक प्राथमिक शाळांमध्ये विद्यादानाचे काम केले. शिस्तप्रिय शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. ३५ वर्षांपूर्वी ते मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते .अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध होते. गेले काही दिवस ते आजारी होते. शनिवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात त्यांच्या कामळेवीरवाडी येथील निवासस्थानी जाऊन अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले व कुटुंबीयांचे सांत्वन केले. प्रभाकर सावंत यांच्या पश्चात पत्नी ,भाऊ ,एक मुलगा, तीन मुली, जावई ,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शनिवारी संध्याकाळी त्यांच्यावर कामळेवीरवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page