⚡कुडाळ ता.०३-: तालुक्यातील पांग्रड येथील सुप्रसिद्ध हाडवैद्य यशवंत पांडुरंग मेस्त्री, (पांग्रड ) यांचे शनिवार दि. २ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय ८० वर्षे होते.
पणदूर येथील ओम आयुर्वेदा उपचार केंद्राचे संचालक, तथा श्री गणेश मृदुंग वादन क्लासचे संचालक, मार्गदर्शक, सुप्रसिद्ध – मृदुंगमणी,पखवाज वादक मोहन मेस्त्री यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना,दोन मुली, नातवंडे, तीन भाऊ वहिनी, पुतणे, असा मोठा परिवार असून त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही प्रसंगी अडीअडचणीला धावून जाण्यामध्ये त्यांचा पुढाकार असायचा गणपती समोरच्या आरत्या, भजन गायन यामध्ये त्यांना फार आवड होती.. श्रावण महिन्यामध्ये विविध ग्रंथांची पारायणे ते आवर्जून करीत असत. शरीरातील हाडांचे दोन तुकडे झाले तरी सुद्धा ते सापळी बांधून हाडसांदण्याचं गावठी औषध देऊन रुग्णांना बरे करायचे. मणक्यातील गॅप सुद्धा ते गावठी औषधाने भरून काढायचे. सिंधुदुर्गातच नव्हे तर सिंधुदुर्गाच्या बाहेर सुद्धा अनेक हजारो रुग्ण त्यांनी अतिशय कमी खर्चात बरे केलेले आहेत.
पांग्रड येथील सुप्रसिद्ध हाड वैद्य यशवंत मेस्त्री यांचे निधन…
