बांदिवडे गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य…

शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत:शिवसेना बांदिवडे गावभेट कार्यक्रम संपन्न..

⚡मालवण ता.०३-: बांदिवडे गावच्या विकासासाठी शिवसेना कटीबद्ध असून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून या भागातील विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी बांदिवडे येथे आयोजित शिवसेना गावभेट कार्यक्रमात दिली.

यावेळी त्यांच्या सोबत आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे,चिंदर प स प्रमुख भाऊ हडकर,जेराॅन फर्नांडिस, प्रफुल्ल प्रभू, बांदिवडे सरपंच आशू मयेकर, आनंद परब,बाळू माळकर,उदय सावंत,किरण पवार, सुनील घाडी, बांदिवडे माजी सरपंच प्रवीणा परब, ग्रामपंचायत सदस्य आहेत अंजली घाडीगांवकर,स्वाती आहिर,कोईळ माजी सरपंच शामसुंदर साटम, शाहूलखन बांदिवडेकर, शंकर आहिर, अमोल साटम, निलेश साटम, सदाशिव साटम यांस अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

यावेळी बांदिवडे ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत यांना बांदिवडे गावातील विविध विकास कामांसाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले यात त्रिंबक बांदिवडे रस्ता खडी करण डांबरीकरण करणे, बांदिवडे लखनेश्वर मंदिर ते खोरवाडी जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे बांदिवडे पाहुणाई मंदिर ते रायकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे बांदिवडे पालवेवाडी साई मंदिर ते घाडीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे , बांदिवडे भगवंत गड खार बंधारा आदींबाबत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

You cannot copy content of this page