⚡मालवण ता.०३-:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व बंड्या सरमळकर यांच्यावतीने नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी खुली नारळ लढवणे स्पर्धा ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आली आहे.
प्रथम पारितोषिक सोन्याची नथ व पैठणी, द्वितीय पारितोषिक आकर्षक बक्षीस व पैठणी, तृतीय पारितोषिक आकर्षक बक्षीस व पैठणी व इतर आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. खास आकर्षण म्हणून सुरेल बँजे पार्टी यांचे वादन होणार आहे. तसेच लकी ड्रॉ असणार आहे. यावेळी १२ वर्षांखालील मुले-मुलींसाठी वेशभूषा स्पर्धा नारळी पौर्णिमा (कोळी) या थीमवर होणार आहे. अधिक माहितीसाठी भाग्यश्री लाकडे ९२०९१४५९३९, विद्या फर्नांडीस, नीना मुंबरकर, रुपा कुडाळकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.