शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा उपजिल्हाप्रमुखपदी विश्वास गांवकर यांची फेरनियुक्ती…

⚡मालवण ता.०३-:
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा उपजिल्हाप्रमुख पदी मालवण येथील विश्वास गांवकर यांची फेर नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी विश्वास गांवकर यांना नियुक्तीपत्र देत शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, संजय पडते, शिवसेना महिला सेना जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, माजी जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, दिपक पाटकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page