Headlines

महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडीच्या वतीने युवा दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

*💫सावंतवाडी दि.१२-:* महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ सिंधुदुर्ग सावंतवाडी शाखेच्या “आरोग्य समिती” आणि “युवा मंच” यांच्या संयुक्त विद्यमाने “युवा दिनानिमित्त” आज दि 12 जानेवारी रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरास 40 बांधव सहभागी झाले होते. त्यातील 25 जणांनी रक्तदान करून सहकार्य केले आहे. या शिबिराचे उद्घाटन मंडळाचे माजी अध्यक्ष श्री बाळ पुराणिक, शिवानंद भिडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री प्रसाद मराठे , सचिव श्री विद्याधर पाटणकर, खजिनदार घनश्याम गणपुले, युवा मंच प्रमुख श्री पंकज आपटे, हर्षद कशाळकर , आरोग्य समिती प्रमुख डॉ साईनाथ पित्रे आदी उपस्थित होते रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी शासकीय रुग्णालय सावंतवाडी येथील डॉ एम एम बागवान , आरोग्य कर्मचारी सौ उज्वला वाडकर , मानसी बागेवाडी, अनिल खाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले

You cannot copy content of this page