*💫मालवण दि१२-:* मासेमारीचे जाळे ओढत असताना तोल जाऊन समुद्रात पडल्याने शंकर सखाराम फोंडबा (वय-५७ रा. सर्जेकोट) या मच्छीमाराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याची खबर नितीन परुळेकर यांनी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी- सर्जेकोट येथील माऊली कृपा यांच्या मासेमारीच्या पातीवरून कवडा रॉक नजीकच्या समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान मासेमारीचे जाळे ओढत असताना शंकर फोंडबा यांचा तोल गेल्याने समुद्रात पडले. यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. याबाबतची माहिती नितीन परुळेकर यांनी पोलिस ठाण्यात दिली असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पेडणेकर हे करत आहेत.
जाळे ओढताना तोल जाऊन मालवण येथील मच्छिमाराचा मृत्यू…
