सिंधुमित्र प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थांना ‘स्कुल किटचे’ वाटप
सावंतवाडी-:सावंतवाडीतील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असुन, विविध विषयांबाबत जनजागृती, वैद्यकीय, प्रशिक्षण यासह शैक्षणिक कार्य प्रतिष्ठान द्वारे केले जाते. या सर्व कार्यात प्रतिष्ठानचे शैक्षणिक कार्य खुप महत्वाचे असून, यात ‘शब्दगंध’ शालेय वाचनालय, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना छत्री, सायकल तसेच इतर आवश्यक साहित्याचे वाटप केले जाते. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे…
