शिवसेना नागरीकांना न्याय देणारा पक्ष आहे-:बाबुराव धुरी…

*💫दोडामार्ग दि.०२सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे जी पूरहानी झाली, त्यातील नुकसानग्रस्ताना अजून मदत अडीच कोटीचे अनुदान वर्ग झाल्याची माहिती सेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी दिली आहे. लवकरच ही भरपाई वाटप करण्यात येणार आहे. शिवसेना ही तळागाळातील नागरीकांना न्याय देणारा पक्ष आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे जी पूरहानी दोडामार्ग तालुक्यात झाली, त्यानंतर सेनेच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंपासून अनेकांनी पूरग्रस्त कुटुंबाच्या भेटीगाठी घेतल्या. तात्काळ त्यांना मदतही दिली होती. त्याचवेळी शासनाकडून मदतीची ग्वाही दिली होती. मध्यंतरी कोरोना संकटामूळे मदतीसाठी उशीर झाला,मात्र विरोधकांनी टीकास्त्र सोडण्यास सुरू केलं.आताचा निधी म्हणजे कामातून विरोधकांना उत्तर आहे. आम्ही बोलून नाही तर करून दाखविले असाही खोचक टोला धुरी यांनी विरोधकांना लगावला आहे. यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांचे प्रयत्न महत्वाचे आहेत असे धुरी यांनी सांगितले.

You cannot copy content of this page