वेंगुर्ला येथेशैक्षणिक वर्ष 2026-27 नियोजनसंदर्भात बैठक संपन्न…

शून्य शिक्षकी शाळाबाबत नियोजन व मार्गदर्शन..

⚡वेंगुर्ला ता.१३-: सोमवार दि.15 जून रोजी नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 नियोजन संदर्भात वेंगुर्ला सभापती दालन येथे वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. दरम्यान आज शनिवारी झालेल्या बैठकीत तालुक्यातील
शून्य शिक्षकी शाळाबाबत नियोजन करण्यात आले.
यावेळी उपसभापती सचिन देसाई, म्हापण पं. स. सदस्य विष्णू उर्फ आप्पी फणसेकर, गटविकास अधिकारी तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी दिनेश पाटकर, तसेच वेंगुर्ला तालुक्यातील केंद्रप्रमुख व केंद्र मुख्याध्यापक उपस्थित होते. सदर सभेत तालुक्यातील शून्य शिक्षकी शाळांना शिक्षक देण्याबाबत नियोजन करण्यात आले. तालुक्यातील सर्व शाळांची पटसंख्या व तेथील कार्यरत शिक्षक यांचा आढावा घेण्यात आला. शाळा पूर्वतयारीचे नियोजन करण्यात आले. तसेच जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षकांचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक शाळेतील इयत्ता 1 ली मध्ये दाखल होणाऱ्या मुलांच्या संख्येबाबत आढावा घेण्यात आला. शून्य शिक्षकी शाळा शिक्षकांच्या नियोजनाबाबत सूचना देण्यात आल्या. तालुक्यातील धोकादायक शाळा इमारतीबद्दल आढावा घेण्यात आला व सदर नावे जिल्हास्तरावर कळविण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
पाठ्यपुस्तके, गणवेश वितरण कार्यक्रम याबाबत आढावा घेण्यात आला. जास्त पटांच्या शाळांना आवश्यक शिक्षक मागणी पुढील सभेत सादर करण्याविषयी सांगण्यात आले. शाळापूर्व तयारीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी पेंडुर सरपंच संतोष गावडे, केळूस सरपंच योगेश शेट्ये, होडावडा उपसरपंच राजबा सावंत व अन्य उपस्थित होते.
प्रस्तावना कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण व केंद्रप्रमुख श्री. आव्हाड यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page