डाॅ.अमाेल तेली यांनी दिला राजीनामा ;8 फेब्रुवारी राेजी हाेणार निवडणुक
*💫देवगड दि.०२-:* देवगड पंचायत समितीचे उपसभापती डाॅ.अमाेल तेली यांनी आपल्या पदाचा पक्ष ध्येय धाेरणानुसार राजीनामा दिल्यानंतर रिक्त उपसभापती जागेसाठी 8 फेब्रुवारी राेजी निवडणुक प्रक्रिया हाेणार असून यासाठी भाजपाचे पंचायत समिती सदस्य रविंद्र तिर्लाेटकर यांचे नाव पक्षाच्या वरिष्ठांनी निश्चित केल्याची राजकिय वर्तुळात चर्चा केली जात आहे. देवगड पंचायत समितीचे सभापतींची निवड हि नुकतीच करण्यात आली आहे.शेवटच्या टर्ममधील उपसभापती पदाची निवड हि 8 ेब्रुवारी राेजी असून या उपसभापती पदासाठी भाजपाचे पंचायत समिती सदस्य रविंद्र तिर्लाेटकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.देवगड पंचायत समितीवरती भाजपाची एकहाती सत्ता आहे. एकूण 16 सदस्य असलेल्या या पंचायत समितीमध्ये 15 सदस्य हे भाजपाचे आहेत. उपसभापती पदी शेवटच्या क्षणी निर्णय बदलला गेला तर भाजपाच्या पंचायत समिती सदस्य पुर्वा तावडे यांच्या देखील नावाचा विचार हाेवू शकताे? .नुकत्याच झालेल्या देवगड तालुक्यामधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमधील नुतन सभापती रवि उ\र् लक्ष्मण पाळेकर यांच्या गावची ग्रामपंचायत विराेधी पक्षाच्या म्हणजेच शिवसेना पक्षाच्या ताब्यामध्ये गेली आहे. तर पंचायत समिती सदस्य रविंद्र तिर्लाेटकर यांनाही गावच्या ग्रामपंचायतीची सत्ता गमवावी लागली असून पुरळ ग्रामपंचायत हि शिवसेनेच्या ताब्यामध्ये गेली आहे. मात्र असे असताना रवि पाळेकर हे सभापती पदी विराजमान झाले आहेत. तर उपसभापती पदाच्या निवडीसाठी रविंद्र तिर्लाेटकर यांच्या नावावरती शिक्का मुहुर्तब करण्यात आला आहे. देवगड तालुक्यातील विजयदुर्ग व देवगड असे दाेन विभाग गणले जातात. विजयदुर्ग विभागामधून रवि पाळेकर हे सभापती झाले आहेत. रविंद्र तिर्लाेटकर हे देखील विजयदुर्ग विभागामधील असल्यामुळे दाेनही पदे हि याच विभागामध्ये मिळणार आहेत. यामुळे उपसभापती हाेण्यास रविंद्र तिर्लाेटकर यांना पक्षांतर्गत विराेध असल्याचेही बाेलले जात आहे. शेवटच्या क्षणी पक्ष श्रेष्ठीकडून धक्कातंत्राचा अवलंब झाल्यास देवगड तालुका उपसभापती पदी पुर्वा तावडे,निकिता कदम यांच्याही नावाचा विचार हाेवू शकताे.
