*💫वेंगुर्ले दि.०२-:* नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित खुल्या निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर – पुणे येथील सुकन्या संतोष आरु प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. युवा सप्ताह प्रतिभागीता दिवस अंतर्गत ‘तरुणाईमध्ये वाढते आत्महत्येचे प्रमाण: एक गंभीर समस्या ‘ या विषयावर आयोजित खुल्या निबंध लेखन स्पर्धेत पुणे,कोल्हापूर,मुंबई सह ९२ स्पर्धकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.दैनंदिन जीवन जगत असताना परीक्षातील अपयश, बेरोजगारी,नातेसंबंधातील ताण- तणाव, नैराश्य, व्यसनाधीनता शा अनेक कारणांना पर्याय आत्महत्या समजून समाजात तरुणाई बळी पडत असल्याचे दिसून आल्याने अशा गंभीर विषयावर भाष्य करण्यासासाठी आयोजित या निबंध स्पर्धेत सुकन्या आरु (पुणे) यांनी निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक क्रमांक पटकावला, तर द्वितीय संजीव आत्माराम राऊत (देवगड), तृतीय निता नितीन सावंत(सावंतवाडी) यांनी तर मंदार सदाशिव चोरगे (वैभववाडी) व लविना जॉन्सन डिसोजा(वेंगुर्ला) यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करून यश संपादन केलं.सर्व विजेत्यांना ४ फेब्रुवारी २०१२ रोजी साई मंगल कार्यालय वेंगुर्ले येथे मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.निबंध स्पर्धेचे परिक्षण निवृत्त मुख्याध्यापक अजित राऊळ (मुंबई) यांनी केले.
खुल्या निबंध लेखन स्पर्धेत पुणेची सुकन्या आरु प्रथम…
