*नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला धरले धारेवर;सफाई कामगारांकडूनच आग लावली जात असल्याचा केला गंभीर आरोप
*💫मालवण दि.०२-:* मालवण आडारी येथील डम्पिंग ग्राउंडला आठवड्याभरात तिसऱ्यांदा आग लागल्यानंतर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने संतप्त झालेल्या मालवण आडारी येथील नागरिकांनी आज नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरत सफाई कामगारांकडूनच जाणीवपूर्वक लावली जात असल्याचा गंभीर आरोप करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशा आशयाची मागणी नागरिकांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या कडे केली आहे. दरम्यान, या आगीत ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर सोमवारी भर मध्यरात्री अडीज वाजता खंडित झालेला वीज पुरवठा तब्बल अठरा तासांनी सुरू झाला मालवण नगरपालिकेच्या अखत्यारीती तील आडारी येथील डम्पिंग ग्राऊंड मधील कचरा रस्त्यावर येत असून या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना ही त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना सांगूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकां मध्ये नाराजी असताना सोमवारी मध्यरात्री अडीज वाजण्याच्या सुमारास अचानक डम्पिंग ग्राऊंड मधील कचऱ्याला आग लागली ही आग एव्हढी भीषण होती की आगीच्या ज्वालानी आसमंत वेढून गेला होता डम्पिंग ग्राऊंडला लागलेली हि आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले गेले या आगीत ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर सोमवारी भर मध्यरात्री वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले यावेळी नागरिकांनी मोकाट जनावरे डम्पिंग ग्राऊंडमध्ये घुसून कचरा इतरत्र पसरवतात. प्लॅस्टिकच्या पिशव्या उडुन रस्त्यांवर व खाजगी कुंपणात जातात. परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करतानाच ही आग लावली जात असल्याचा आरोप केला जात आहे यावेळी समीर फाटक, जयंत कामतेकर, चंदन कामतेकर, पप्या गावकर, मुन्ना फाटक, बाळू नाटेकर, राजन भोजने, गुरुनाथ शिरोडकर, विद्याधर फाटक, विष्णू भोजने आदी व इतर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि पालिका कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली. तसेच जेसीबीला बोलावून ट्रान्सफार्मरच्या बाजूला तसेच रस्त्यावर आलेले ढीग हटविण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी या आगीप्रकरणी अज्ञातावर गुन्हे दाखल करा असे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले.
