निधी संकलनासाठी कणकवली पटकीदेवी मंदिरपासून शहरातून फिरणार
*💫कणकवली दि.०३-:* अयोध्येतील श्रीराममंदिर निर्मितीच्या निधी संकलन जनजागृतीसाठी रामरथ सिंधुदुर्गात दाखल झाला असून सकाळी ११ वाजता कणकवली पटकीदेवी मंदिरपासून रामरथ शहरातून फिरणार आहे. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. १५ फेब्रुवारीपर्यंत श्रीराममंदिर निर्मितीसाठी निधी समर्पण अभियान भाजपच्या वतीने राबविण्यात येत आहे. आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गातील सर्वसामान्य जनतेचा राममंदिर च्या राष्ट्रीय कार्यात सहभाग असावा यासाठी जनजागृती करण्यासाठी रामरथ आजपासून सिंधुदुर्गात दाखल होत आहे.
