वाहनचालकांत भीती
*💫बांदा दि.०३-:* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस इटलादेवी येथे रात्रंदिवस गव्यांचा वावर नेहमी वाढतच चालला आहे. भातशेतीसह अन्य पिकांची नासधूस करणारे गवे आज चक्क रस्त्यावरच ठाण मांडून होते. त्याचदरम्यान येथून जाणाऱ्या दुचाकीस्वाराने हॉर्न वाजवत आरडाओरड केल्याने दहा ते बारा गव्यांनी आपला पाय जंगलाच्या दिशेने वळवला. गवे वाहतूक रोखत असल्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाजवळ वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी करुनही निदान ‘गव्यांचा अधिवास’ असा फलक लावण्याची तसदीही वनविभाग घेत नसल्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
