Headlines

Global Maharashtra Breaking News

स्टंटबाजी न करता ठाकरे सरकारने पेट्रोल वरील टॅक्स कमी करावा – अमित परब

*💫सावंतवाडी दि.०५-:* हिम्मत असेल तर ठाकरे सरकारने गोवा सरकार प्रमाणे पेट्रोल वरील टॅक्स कमी करून पेट्रोल चे भाव कमी करून स्वस्त दरात पेट्रोल विकावे स्टंटबाजी करून जनतेची दिशाभूल करू नये तसेच केंद्र सरकारवर अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घ्यावा अशी टीका ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी केली आहे.

Read Full News

दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा प्रखर निदर्शने करण्यात येतील-: बाबुराव धुरी…

*💫दोडामार्ग दि.०५ सुमित दळवी-:* पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्या या मागणीसाठी दोडामार्ग तहसिलदार यांना शिवसेना दोडामार्गच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्रसरकारच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. पेट्रोल डिझेल दरवाढ, शेतकऱयांच्या प्रश्नावर राज्यात निदर्शने होत असताना दोडामार्गातही निदर्शने करण्यात आली. पेट्रोल डिझेल दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा यापेक्षा प्रखर निदर्शने करण्यात येतील असा इशारा बाबुराव…

Read Full News

*इंधन दरवाढीविरोधात कणकवलीत सेनेचा भव्य मोर्चा

बैलगाडी चालवत सतिश सावंत व संदेश पारकर यांनी केले मोर्चाचे नेतृत्व; प्रांताधिकारी कार्यालयाला धडक* *💫कणकवली दि.०५-:* कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, पेट्रोल डिझेलचे दर कमी करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत कणकवलीत शिवसेनेने भव्य मोर्चा काढत केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीबद्दल निषेध केला. कणकवली पटकी देवी येथून बाजारपेठ…

Read Full News

सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते बचतगटाच्या गाळ्याचे उद्घाटन…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* ओरोस पंचायत समितीच्या सदस्या सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते स्वरा (सुमंगल) स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या गाळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बचतगटाच्या अध्यक्षा वनिता जुवेकर, सचिव लक्ष्मी जाधव, संध्या चौगुले, आरती वारंग, रत्नमाला यादव, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव उपस्थित होते. यावेळी सुप्रिया वालावलकर म्हणाले की, या बचतगटाच्या माध्यमातून याठिकाणी संगणक आॅनलाईन सेवा, झेरॉक्स, कलर…

Read Full News

*इंधन दरवाढी विरोधात सेनेचे तहसीलदार म्हात्रे यांना निवेदन

*💫सावंतवाडी दि.०५-:* शिवसेनेच्या वतीने सावंतवाडीत पेट्रोल, डिझेल, गॅस च्या वाढलेल्या दराविरोधात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी या मोर्चाने तहसीलदार कार्यालयात धडक देत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देण्यात आले आहे.

Read Full News

*तो स्टॉल डिक्री केलेल्या जागेवर लावू देणार नाही

*अन्यथा मुख्याधिकारी यांच्यावर करणार कायदेशीर कारवाई; संजू परब यांचा इशारा* *💫सावंतवाडी दि.०५-:* रवि जाधव यांनी बाजारपेठेत स्टॉल मिळवा यासाठी उपोषण पुकारले होते. हे उपोषण आमदार दिपक केसरकर यांनी उठवून आपण न्याय देऊ असे सांगत उपोषण स्थगित केले होते. याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्याधिकार्‍यांना तोंडी आश्वासन देऊन स्टॉल लावण्यास परवानगी दिली आहे. तसेच हा…

Read Full News

*इंधन दरवाढी विरोधात सेनेचा सावंतवाडीत बैलगाडी मोर्चा*

*💫सावंतवाडी दि०५-:* शिवसेनेच्या वतीने आज पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधात आमदार दिपक केसरकर यांच्या कार्यालयाकडून तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी इंधन दरवाढी मुळे भविष्यात पुन्हा बैलगाडी वापरावी लागणार असल्याचे दर्शवत. खास बैलगाडीतून हा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे….

Read Full News

कणकवली तालुका व्यापारी संघ अध्यक्षपदी दीपक बेलवलकर यांची निवड…

*💫कणकवली दि.०५-:* कणकवली तालुका व्यापारी संघ अध्यक्षपदी दीपक बेलवलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.कणकवली तालुका व्यापारी संघाची बैठक शहरातील साई पॅलेस हॉटेलमध्ये व्यापारी संघाचे मावळते तालुकाध्यक्ष विशाल कामत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कामत यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे पुढील ३ वर्षांसाठी तालुका व्यापारी संघाच्या अध्यक्षपदाबाबत विचारविनिमय झाला. सर्वानुमते दीपक बेलवलकर यांची कणकवली तालुका व्यापारी संघ अध्यक्षपदी…

Read Full News

*पेट्रोल दरवाढी विरोधात सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या आंदोलन

*तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांची माहिती* *💫सावंतवाडी दि.०४-:* पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात केंद्र शासनाचा विरोधात उद्या शिवसेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात आले आहे. उद्या सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने आमदार दिपक केसरकर यांच्या ऑफीस कडून छेडण्यात येणार असून, या आंदोलनाला तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सकाळी १०वा उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी…

Read Full News

कुर्ली धरणग्रस्तांचे आंदोलन दहाव्या दिवशी तूर्तास स्थगित

प्रशासन दखल घेत नसल्याने न्यायालयात दाद मागण्याचा घेण्यात आला निर्णय* *💫सिंधुदुर्गनगरी दि. ०४-:* कुर्ली घोणसरी धरणग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसांपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आंदोलन आज दहाव्या दिवशी तूर्तास स्थगित केले असून याबाबत जिल्हा प्रशासन दखल घेत नसल्याने आता न्यायालय व शासन स्तरावर दाद मागणार असल्याचा निर्णय घेतला आहे. गेली पंचविस वर्षात…

Read Full News

You cannot copy content of this page