सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते बचतगटाच्या गाळ्याचे उद्घाटन…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* ओरोस पंचायत समितीच्या सदस्या सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते स्वरा (सुमंगल) स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या गाळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बचतगटाच्या अध्यक्षा वनिता जुवेकर, सचिव लक्ष्मी जाधव, संध्या चौगुले, आरती वारंग, रत्नमाला यादव, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव उपस्थित होते. यावेळी सुप्रिया वालावलकर म्हणाले की, या बचतगटाच्या माध्यमातून याठिकाणी संगणक आॅनलाईन सेवा, झेरॉक्स, कलर झेरॉक्स, लॅमिनेश, आॅफिस स्टेशनरी, शैक्षणिक साहित्य, महिलांच्या शृंगार साहित्य, किरकोळ भाजी फळे विक्री तसेच केंद्रीय माहिती अधिकार, विविध शासकीय योजना, शासकीय योजनांचे विविध अर्जाचाही लाभ जनतेच्या सोयीसाठी होणार आहे

You cannot copy content of this page