बैलगाडी चालवत सतिश सावंत व संदेश पारकर यांनी केले मोर्चाचे नेतृत्व; प्रांताधिकारी कार्यालयाला धडक*
*💫कणकवली दि.०५-:* कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, पेट्रोल डिझेलचे दर कमी करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत कणकवलीत शिवसेनेने भव्य मोर्चा काढत केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीबद्दल निषेध केला. कणकवली पटकी देवी येथून बाजारपेठ मार्गे निघालेला मोर्चा महामार्ग वरून प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चचे नेतुत्व शिवसेना नेते संदेश पारकर व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी बैलगाडीत बसून स्वतः बैलगाडीचे सारथ्य केले. शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विविध घोषणांनी कणकवली दणाणून सोडली. या मोर्चात शिवसेनेचे नेते संदेश पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर,रुपेश नार्वेकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, नगरसेविका मानसी मुंज, मीनल तळगावकर, ॲडव्होकेट हर्षद गावडे, राजू राठोड, विलास कोरगावकर, शेखर राणे, अनिल हळदीवे , नासिर खान, रिमेश चव्हाण, संजय पारकर, सुनील पारकर, विलास गुडेकर, संतोष पुजारे, संदेश पटेल, प्रतिक्षा साटम, रश्मी बाणे, आदित्य सापळे, तेजस राणे, भिवा परब, सत्यवान राणे, वैभव मानकर, आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी झाले होते. या निषेध मोर्चात विविध फलक घेत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोदी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये असलेला संताप व पेट्रोल-डिझेल दरवाढीने जनतेची झालेली निराशा यामुळे जनतेमधून केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त होत आहे. व त्याचाच एक भाग म्हणून हा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी संदेश पारकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत बाजारपेठेत एकच घोषणाबाजी केली. ज्या बैलगाडीत संदेश पारकर व सतीश सावंत एकत्र सारथ्य करत होते त्या बैलगाडीच्या बैलांचा एक कासरा पारकर यांच्या हाती तर दुसरा कासरा सतीश सावंत यांच्या हाती होता. या दोघांच्या नेतृत्वाखालीच हा निषेध मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयात येऊन धडकला.
