कणकवली तालुका व्यापारी संघ अध्यक्षपदी दीपक बेलवलकर यांची निवड…

*💫कणकवली दि.०५-:* कणकवली तालुका व्यापारी संघ अध्यक्षपदी दीपक बेलवलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.कणकवली तालुका व्यापारी संघाची बैठक शहरातील साई पॅलेस हॉटेलमध्ये व्यापारी संघाचे मावळते तालुकाध्यक्ष विशाल कामत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कामत यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे पुढील ३ वर्षांसाठी तालुका व्यापारी संघाच्या अध्यक्षपदाबाबत विचारविनिमय झाला. सर्वानुमते दीपक बेलवलकर यांची कणकवली तालुका व्यापारी संघ अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शहरातील प्रतिथयश सुवर्णकार असलेले दीपक बेलवलकर हे रोटरी क्लब च्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असतात. अजातशत्रू म्हणून बेलवलकर यांची ओळख आहे. सर्व व्यापारी बांधवाना एकत्र घेऊन व्यापारी हिताच्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू ठेवू असे निवडीनंतर बेलवलकर यांनी सांगितले. यावेळी मावळते तालुकाध्यक्ष विशाल कामत, सचिव विलास कोरगावकर , उपतालुकाध्यक्ष राजन पारकर, खजिनदार अमोल कामत,अनिल अणावकर, चंद्रशेखर चव्हाण, राजेश राजाध्यक्ष, निवृत्ती धडाम, बंडू खोत,दयानंद उर्फ नंदू उबाळे, हेमंत गोवेकर, आनंद पोरे, सुरभा गावकर, हर्षल उर्फ राजू गवाणकर, सुजित जाधव, संतोष काकडे, सुशील पारकर आदी व्यापारी बांधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page