*💫सावंतवाडी दि०५-:* शिवसेनेच्या वतीने आज पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधात आमदार दिपक केसरकर यांच्या कार्यालयाकडून तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी इंधन दरवाढी मुळे भविष्यात पुन्हा बैलगाडी वापरावी लागणार असल्याचे दर्शवत. खास बैलगाडीतून हा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे. हा मोर्चा तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात येणार असून, इंधन दरवाढी विरोधात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देण्यात येणार आहे . यावेळी तालुक्यातील जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
*इंधन दरवाढी विरोधात सेनेचा सावंतवाडीत बैलगाडी मोर्चा*
