*तो स्टॉल डिक्री केलेल्या जागेवर लावू देणार नाही

*अन्यथा मुख्याधिकारी यांच्यावर करणार कायदेशीर कारवाई; संजू परब यांचा इशारा*

*💫सावंतवाडी दि.०५-:* रवि जाधव यांनी बाजारपेठेत स्टॉल मिळवा यासाठी उपोषण पुकारले होते. हे उपोषण आमदार दिपक केसरकर यांनी उठवून आपण न्याय देऊ असे सांगत उपोषण स्थगित केले होते. याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्याधिकार्‍यांना तोंडी आश्वासन देऊन स्टॉल लावण्यास परवानगी दिली आहे. तसेच हा स्टॉल लावण्यास न दिल्यास शहरातील अनधिकृत १३६ स्टॉल वर कारवाई करण्याचे तोंडी आदेश देण्यात आले आहेत. शहरातील १३६ पैकी १३३ अनधिकृत स्टॉल हे सेनेच्या कारकिर्दीत लागले असून, फक्त ३ स्टॉल हे गेल्या एका वर्षात लागले आहेत. तसेच मुख्याधिकारी यांनी नगरविकास मंत्री यांनी दिलेल्या तोंडी आदेशानुसार कोणाच्या दबावाखाली येऊन तो स्टॉल डिक्री केलेल्या जागेवर लावलास मुख्याधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे

You cannot copy content of this page