Headlines

Global Maharashtra Breaking News

*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या मोफत आरोग्य शिबिरास सुरुवात

*राजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले शिबिराचे उद्घाटन *💫सावंतवाडी दि.२७-:* जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व अथायु मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन राजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, मुत्र व किडनी विकार, कॅन्सर, इत्यादी अनेक आजाराची मोफत तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती…

Read Full News

*गवा रेडा आडवा आल्याने मळगाव घाटात कार कोसळली

सुदैवाने कोणीही जख्मी नाही* *💫सावंतवाडी दि.२७-:* तालुक्यातील मळगाव घाटीत मारुती इको कार कोसळून अपघात झाला आहे. अचानक गवा रेडा आडवा आल्याने गाडी बाजूला घेताना हा अपघात झाला आहे. या अपघातात कार सुमारे १०० फूट खाली कोसळली असून, सुदैवाने यातील कोणीही प्रवासी जख्मी झाले नाहीत. हा अपघात आज भल्या पहाटे ४ च्या सुमारास घडला आहे.

Read Full News

खोतजूवा येथील तुळशीदास खोत यांचे वृद्धापकाळाने निधन…

*💫मालवण दि.२६-:* मालवण तालुक्यातील खोत जुवा येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास अनाजी खोत ( वय ९०) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. परोपकारी वृत्ती असणारे तुळशीदास अनाजी खोत यांचा मित्रपरिवार दांडगा होता. शेतकरी म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता खोत जुवा येथील सामाजिक तसेच धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन…

Read Full News

पद्मश्री पुरस्कारप्राप्त परशुराम गंगावणे यांचा आनंदयात्री वाङमय मंडळ व सातेरी प्रासादिक मंडळ वेंगुर्ले यांच्या वतीने सत्कार….

*💫वेंगुर्ले दि.२६-:* ठाकर आदिवासी समाजाची वारली चित्रकथी कला व कळसुत्री बाहुल्या ही काळाच्या ओघात लोप पावत चाललेली पारंपरिक लोककला जिवंत ठेवण्यासाठी गेली पन्नास वर्षे तिचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र परशुराम गंगावणे यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंदयात्री वाङमय मंडळ व…

Read Full News

‘कॅट’ आंदोलनात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा सहभाग…

काळी फीत लावून व्यक्त केला निषेध : वस्तू आणि सेवा कर कार्यालयाबाहेर दाखवले काळे झेंडे *💫मालवण दि.२६-:* केंद्र सरकराने लागू केलेल्या जीएसटी मधील जाचक अटी, तरतुदी व किचकट संगणक प्रणालीच्या विरोधात’ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली (कॅट) अखिल भारतीय कंजूमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूटर फेडरेशन यांनी पुकारलेल्या ‘भारत व्यापार बंद’ व ‘देशव्यापी चक्काजाम’ आंदोलनाला जिल्हा…

Read Full News

दोन मुलांनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या लाभार्थी दाम्पत्यांचा सत्कार….

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्ण कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सत्काराचे आयोजन *💫बांदा दि.२६-:* दोन मुलांनंतर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या १० समाधानी लाभार्थी दाम्पत्यांचा बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्ण कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला. दोन मुलांनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी शासनाकडून जनजागृती करण्यात येते. मात्र बहुतांश पालक या योजनेकडे…

Read Full News

देशात होत असलेली आंदोलने मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी

विनोद तावडे यांचा आरोप;मोदी सरकारमधील एक तरी भ्रष्टाचारी मंत्री दाखवण्याचे विरोधकांना आव्हान *💫कणकवली दि.२६-:* गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने महत्वाचे निर्णय घेतले त्यात जीएसटी, एपीएमसी असो,हे सगळे विषय काँग्रेसला करायचे होते.त्यांना हे निर्णय घेता आले नाहीत.पण कणखर मोदी सरकारने शेतकरी हिताचे घेतले आहेत.आता काँग्रेस व विरोधी पक्ष विरोध करत आहेत.देशातील आता होत असलेली आंदोलने ही…

Read Full News

बांदा-गडगेवाडीत सापडलेल्या कोब्रा सापाला जीवनदान…

*💫बांदा दि.२६-:* बांदा-गडगेवाडी येथे नागरी वस्तीत शिरलेल्या भल्यामोठ्या कोब्रा सापाला सर्पमित्र राजा खान यांनी शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. येथील नागरी वस्तीत काल सायंकाळी उशिरा भलामोठा नाग शिरला. स्थानिकांनी याची कल्पना सर्पमित्र राजा खान यांना दिली. त्यांनी शिताफीने नागाला पकडले. नागाला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य हुसेन मकानदार, आबा माजगावकर, सुंदर…

Read Full News

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

*💫ओरोस दि.२६-:* राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.शनिवार दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता खासगी हेलिकॉप्टरने पोलिस परेड ग्राऊंड ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह ओरोसकडे प्रयाण. सकाळी 10.15 शासकीय विश्रामगृह ओरोस येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता कोरोना आजार…

Read Full News

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून न्यू इंग्लिश स्कुल पेंडुर येथील १० मुलींना सायकल वितरण….

*💫मालवण दि.२६-:* माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून, गोवा विमानतळ प्राधिकरण व जनशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कुल पेंडुर मधील १० मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. गरजू व लांब अंतरावर राहणाऱ्या मुलींची शाळेत येण्या जाण्याची सोय व्हावी ग्रामीण भागात असलेली वाहतुकीची समस्या दूर व्हावी अशा उद्देशाने मा. सुरेश प्रभू गेली कित्येक वर्षे…

Read Full News

You cannot copy content of this page