*💫मालवण दि.२६-:* मालवण तालुक्यातील खोत जुवा येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास अनाजी खोत ( वय ९०) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. परोपकारी वृत्ती असणारे तुळशीदास अनाजी खोत यांचा मित्रपरिवार दांडगा होता. शेतकरी म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता खोत जुवा येथील सामाजिक तसेच धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे. राष्ट्रीय कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ खोत यांचे ते काका होत.
खोतजूवा येथील तुळशीदास खोत यांचे वृद्धापकाळाने निधन…
