देशात होत असलेली आंदोलने मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी

विनोद तावडे यांचा आरोप;मोदी सरकारमधील एक तरी भ्रष्टाचारी मंत्री दाखवण्याचे विरोधकांना आव्हान

*💫कणकवली दि.२६-:* गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने महत्वाचे निर्णय घेतले त्यात जीएसटी, एपीएमसी असो,हे सगळे विषय काँग्रेसला करायचे होते.त्यांना हे निर्णय घेता आले नाहीत.पण कणखर मोदी सरकारने शेतकरी हिताचे घेतले आहेत.आता काँग्रेस व विरोधी पक्ष विरोध करत आहेत.देशातील आता होत असलेली आंदोलने ही मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी असल्याचा आरोप राष्टीय सचिव,माजी मंत्री विनोद तावडे यांनी केला. मोदी सरकारमधील एक तर भ्रष्टाचारी मंत्री दाखवा,असे खुले आव्हान विरोधकांना त्यांनी दिले.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहे.यावेळी बँक संचालक अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, सभापती मनोज रावराणे,तालुकाध्यक्ष संतोष कानडे,मिलींद मेस्त्री,बबलू सावंत,मेघा गांगण, संतोष पूजारे,समर्थ राणे,पूजा कर्पे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
कॉग्रेसला विरोध करण्यासाठी हा खटाटोप आहे.कृषी कायद्याबद्दल  पंजाब व छत्तीसगडमधील कॉग्रेस  सरकारने अडाणी बरोबर करार केले.देशात पहिलं मोदी नावाने एक मैदान केले.त्याबद्दल विरोधकांनी टीका केली.पण देशात कित्येक मैदाने राजीव गांधी,इंदिरा गांधी,जवाहर नेहरु यांच्या नावाने २७ ठिकाणी आहेत,असा टोला विनोद तावडे यांनी लगावला.
देशात महात्मा गांधी,जे.पी. नारायण,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक आंदोलने केली. डॉ.आबेडकर आंदोलनात केव्हाच हिंसा नव्हती.आता आंदोलने होतात,तेच तेच लोक असतात एकत्रित पणे ठरवून आंदोलने करतात.त्याला आंदोलन जीवी लोक म्हणतात.सिंधु बॉर्डर,शाईनबागला आंदोलन केल्याने, रस्त्यावर बसून आंदोलकांनी जनजीवन विस्कळीत केले .मला असं वाटत देशात निवडक गोष्टी ठरवून आंदोलन केले जात आहेत.त्या आंदोलकांवर भाजपचे सरकार अन्याय काय करते?यासाठी प्रयत्न काही आंदोलन जीवी लोक करतात,असा आरोप विनोद तावडे यांनी केला.मोदी सरकार आल्यानंतर ७ वर्षे झाली.एक तरी भ्रष्टाचारी एक तरी दाखवा.एक प्रकारे विरोधाला विरोध काँग्रेस करत असल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page