*💫बांदा दि.२६-:* बांदा-गडगेवाडी येथे नागरी वस्तीत शिरलेल्या भल्यामोठ्या कोब्रा सापाला सर्पमित्र राजा खान यांनी शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. येथील नागरी वस्तीत काल सायंकाळी उशिरा भलामोठा नाग शिरला. स्थानिकांनी याची कल्पना सर्पमित्र राजा खान यांना दिली. त्यांनी शिताफीने नागाला पकडले. नागाला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य हुसेन मकानदार, आबा माजगावकर, सुंदर गवंडी आदी उपस्थित होते.
बांदा-गडगेवाडीत सापडलेल्या कोब्रा सापाला जीवनदान…
