*💫मालवण दि.२६-:* माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून, गोवा विमानतळ प्राधिकरण व जनशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कुल पेंडुर मधील १० मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. गरजू व लांब अंतरावर राहणाऱ्या मुलींची शाळेत येण्या जाण्याची सोय व्हावी ग्रामीण भागात असलेली वाहतुकीची समस्या दूर व्हावी अशा उद्देशाने मा. सुरेश प्रभू गेली कित्येक वर्षे जनशिक्षण संस्थे मार्फत ग्रामीण भागातील मुली, महिला यांच्यासाठी सेवा कार्य करत आहेत. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना न्यू इंग्लिश स्कुल पेंडुर संस्थेचे अध्यक्ष बाबराव राणे यांनी अशा प्रकारचे उपक्रम आमच्या शाळेत राबविण्याल्या बद्दल संस्थेचे व उपस्थित पदाधिकारी यांचे आभार मानले. यावेळी जनशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विजय केनेवडेकर यांनी येत्या काळात अशाप्रकारे महिलांसाठी गारमेंट क्लस्टर देखील पेंडुर मध्ये सुरू होईल त्यामुळे देखील महिलांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल व गावाच्या विकासाच्या दृष्टीने खरोखरच परिवर्तनाची सुरुवात होईल असे सांगितले. या कार्यक्रमाला सरपंच सुनीता मोरजकर, समन्वयक विलास हडकर, शालेय संस्था अध्यक्ष बाबाराव राणे, सचिव घनश्याम राणे, आप्पा सावंत, शक्तिकेंद्र प्रमुख आतीक शेख, संचालक दिपा सावंत, रविंद्र गावडे, भारत परब, सत्यवान परब, शेखर फोंडेकर, ग्रामपंचायत सदस्य शैलेश परब, सुमित सावंत, बिपीन परब, अमित सावंत, योगेश सावंत, मिलिंद चव्हाण, गणेश राऊळ, न्हानू पेंडुरकर, मुख्याध्यापक तावडे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री तावडे सर ह्यांनी केले, आभार सौ. नाईक मॅडम यांनी मानले.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून न्यू इंग्लिश स्कुल पेंडुर येथील १० मुलींना सायकल वितरण….
