*कारमधील दोघे किरकोळ जख्मी*
मालवण दि प्रतिनिधी मालवणला होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी पुणे येथून येणाऱ्या कारची आणि जेसीबी यांच्यात झालेल्या अपघातात कार मधील दोघे किरकोळ जखमी झाले आहेत हे अपघात वराड कुसरवे येथे आज दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास घडला या अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे पुणे येथून मालवणला नातेवाईकांच्या लग्नाला येणाऱ्या कुटुंबियांच्या कारला वराड कुसरवे मार्गावर अपघात घडला. मालवण कसाल या मुख्य रस्त्यावर वराड येथून येत असताना कुसरवे येथून मुख्य रस्त्यावर येणारा जेसीबी आणि पुणे येथून मालवणच्या दिशेने येणारी कार यांच्यात ही टक्कर झाली कार मध्ये सात व्यक्ती होत्या यात कारचे मोठे नुकसान झाले. कारमध्ये असलेल्या कुटुंबा पैकी दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांना कोणतीही नोंद नव्हती