Headlines

Global Maharashtra Breaking News

गोव्यात जाणाऱ्या नोकरदारांचा प्रश्न लवकरच सुटेल…

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली : गोवा मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा_ *💫बांदा दि.१३-:* कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे गोवा राज्यात जिल्ह्यातील नोकरदारांना रोखण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याशी आम्ही चर्चा केली असून यातून लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही त्यांनी दिली असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन…

Read Full News

*तालुक्यातील मठबुद्रुक, निरोम, श्रावण गावात लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

उपसभापती राजू परुळेकर यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आले लसीकरण* मालवण दि प्रतिनिधी मालवणचे उपसभापती श्री राजू परुळेकर यांच्या प्रयत्नातून मालवण तालुक्यातील मठबुद्रुक, निरोम, श्रावण या गावांमधील ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लस करून दिल्यानंतर काल पासून या गावांमध्ये लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला मालवण तालुक्यातील मठबुद्रुक, निरोम, श्रावण या गावांमधील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होत नसल्याने…

Read Full News

उसप येथे ४५ वर्षावरिल १६३ नागरिकांचे लसिकरण

आरोग्य सभापती डॉ दळवींनी यंत्रणेचे केले अभिनंदन *💫दोडामार्ग दि.१३-:* 45 वर्षावरील व्यक्तींना जास्त प्रवास करावा लागू नये.प्राथमिक आरोग्य केंद्र वरील लसीकरणासाठी असलेली गर्दी कमी करणे व गाव पातळीवरच लोकांना लसीकरण उपलब्ध व्हावे याकरिता शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या प्रयत्नातून दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य अंतर्गत उसप येथे १६३ नागरीकांचे लसीकरण करण्यात आले.दोडामार्ग…

Read Full News

चिक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे..

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी_ *💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* अग्नेय अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे केरळ तसेच लक्षद्वीप किनाऱ्यावर चक्रीवादळ निर्माण होऊन त्याची तिव्रता वाढत जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच सदरच्या वादळाचा परिणाम दि. 15 ते 17 मे दरम्यान दक्षिण कोकण व गोव्याच्या किनाऱ्यावर ही होण्याची शक्यता आहे. तसेच 15 व 16 मे रोजी जिल्ह्यात…

Read Full News

रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व उपकेंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करा…

शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांची मागणी_ *💫वेंगुर्ले दि.१३-:* वाढत्या कोरोना ला रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना सध्या नागरिकांना जी लस दिली जात आहे, त्याचे योग्य नियोजन करावे तरच गर्दीवर नियंत्रण आणता येईल. रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरणाचे नियोजन आरोग्य विभागाने करावे, अशी मागणी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केली आहे. वेंगुर्ला…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ११६ रूग्ण सापडले

शहरात ३६ तर ग्रामीणात ८० *💫सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ११६ रुग्ण सापडले असून, शहरात ३६ तर ग्रामीण भागात ८० रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात जूनाबाझार १, खासकीलवाडा ५, भटवाडी २, गरड १, सर्वोदय नगर १, द्वारका नगरी १, माठेवाडा १, सावंतवाडी १६, सबनीसवाडा…

Read Full News

जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होवू नये याची दक्षता घ्या

व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी *💫मालवण दि.१३-:* कोल्हापूर जिल्ह्यात येत्या शनिवारी मध्यरात्री पासून संपूर्ण टाळेबंदी लागण्याचे वृत्त असून याच दरम्यान सिंधुदुर्गातील लॉकडाऊन उठणार असल्याने यावेळी कोल्हापूरवरून माल येणे बंद झाल्यास जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई व भाव वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांशी संपर्क करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत…

Read Full News

माणगाव प्रा.आ.केंद्रासाठी दिलेल्या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण…

*💫कुडाळ दि.१३-:* आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतुन माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली असून आज या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका देण्याचा शब्द आ. वैभव नाईक यांनी पूर्ण केला आहे.त्यामुळे रूग्णांना याचा लाभ होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजू कवीटकर,पंचायत समिती सदस्य सौ मथुरा राऊळ,शिवसेना तालुका संघटक…

Read Full News

मळेवाड ‘पीएचसी’साठी स्वतंत्र रुग्णवाहीका द्यावी…

राजन मुळीक यांची मागणी ः आमदार, पालकमंत्र्यांनी दखल घ्यावी_ *💫बांदा दि.१३-:* कोरोना काळात रुग्णांना गोवा बांबुळी तसेच अन्यत्र अधिक उपचारासाठी हलविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेऊन मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला खनिकर्म विभागाकडून अत्याधुनिक व अद्ययाव स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी मळेवाड जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांनी केली आहे….

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ६२९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १३ हजार ७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ३८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६२९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

You cannot copy content of this page