उसप येथे ४५ वर्षावरिल १६३ नागरिकांचे लसिकरण

आरोग्य सभापती डॉ दळवींनी यंत्रणेचे केले अभिनंदन

*💫दोडामार्ग दि.१३-:* 45 वर्षावरील व्यक्तींना जास्त प्रवास करावा लागू नये.प्राथमिक आरोग्य केंद्र वरील लसीकरणासाठी असलेली गर्दी कमी करणे व गाव पातळीवरच लोकांना लसीकरण उपलब्ध व्हावे याकरिता शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या प्रयत्नातून दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य अंतर्गत उसप येथे १६३ नागरीकांचे लसीकरण करण्यात आले.दोडामार्ग तालुक्यामध्ये उसप व आयी उपकेंद्रे निश्चित करून लसीकरणाचे महत्त्वाचे काम मार्गी लावणाऱ्या सर्व आरोग्य व शिक्षक कर्मचारी यांचे शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी व पंचायत समिती सदस्य बाळा नाईक यांनी अभिनंदन केले आहे. उसप गावात उपलब्ध झालेल्या १६३ लसींचे सुयोग्य नियोजनाने करुन गावातील अधिकाधिक ग्रामस्थांना लसीकरणाचा लाभ मिळण्यासाठी पंचायत समिती सदस्य बाळा नाईक व उसप सरपंच दिनेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली उसप उपसरपंच अभिषेक गवस,सदस्य अशोक नाईक,सदस्या संजीवनी गवस,सत्वाशीला गवस,सुविधा सुतार,गोट्या कळणेकर,मुन्ना मोरजकर,शंकर नाईक,निलेश नाईक, दिपक शेटकर,सागर देसाई,नकुळ गवस,चद्रकांत गवस,राहील खाँजा, सचिन देसाई,अजित देसाई,दिपक नाईक,फटी गवस,राजाराम गवस,शंकर जाधव,बाबणी केरकर, सुनील बोकारकर,अमित गवस,प्रविण गवस,बंटी गवस,रत्नाकर गवस,विजय गवस यांचे सोबत साटेली प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी संतोष जाधव व इतर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page