*तालुक्यातील मठबुद्रुक, निरोम, श्रावण गावात लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

उपसभापती राजू परुळेकर यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आले लसीकरण*

मालवण दि प्रतिनिधी मालवणचे उपसभापती श्री राजू परुळेकर यांच्या प्रयत्नातून मालवण तालुक्यातील मठबुद्रुक, निरोम, श्रावण या गावांमधील ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लस करून दिल्यानंतर काल पासून या गावांमध्ये लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला मालवण तालुक्यातील मठबुद्रुक, निरोम, श्रावण या गावांमधील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होत नसल्याने पंचायत समितीचे उपसभापती राजू परुळेकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत ग्रामीण भागात लसीकरण करण्याचे सूचित केले होते. परुळेकर यांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाकडून मठबुद्रुक, निरोम, श्रावण या गावात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मठबुद्रुक, निरोम, श्रावण ही गावे आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडलेली आहेत. मात्र आचरा आरोग्य केंद्र या गावांपासून लांब असल्याने व संपर्क होत नसल्याने आचरा आरोग्य केंद्रात येणारी लस ग्रामीण भागामधील लोकांना उपलब्ध होत नव्हती. यामुळे या गावातील लोक लसीकरणापासून वंचित राहिले होते. या गोष्टीची दखल घेत उपसभापती राजू परुळेकर यांनी जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण तसेच आचरा आरोग्य केंद्रातील डॉ. जाधव यांचे लक्ष वेधले होते. ग्रामीण भागातील लोकांनाही लस मिळावी अशी मागणी परुळेकर यांनी केली होती. याची दखल घेत मठबुद्रुक, निरोम, श्रावण या गावात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामुळे ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page