भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली : गोवा मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा_
*💫बांदा दि.१३-:* कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे गोवा राज्यात जिल्ह्यातील नोकरदारांना रोखण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याशी आम्ही चर्चा केली असून यातून लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही त्यांनी दिली असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी बांदा येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गोवा राज्यात ये-जा करणाऱ्यांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवार आणि गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोकरदार युवकांना परत पाठवण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर आज युवकांनी बांदा सरपंच अक्रम खान यांच्याकडे कैफियत मांडली. श्री.खान यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना याबाबत माहिती देत तोडगा काढण्याची विनंती केली होती.त्या पार्श्वभूमीवर राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान,जिल्हा परिषद सदस्या सौ.श्वेता कोरगावकर, बालकल्याण सभापती सौ.शर्वाणी गावकर,पंचायत समिती सभापती सौ.निकिता सावंत,उपसभापती शीतल राऊळ,माजी सरपंच मंदार कल्याणकर,भाजप शहर अध्यक्ष राजा सावंत,हुसेन मकानदार,भाजप तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर आदि उपस्थित होते.
