*तर एक बैल गंभीर जख्मी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
*💫देवगड दि.१३-:* नारिंग्रे आयतनवाडी येथील अशाेक काशिनाथ मर्तुल यांच्या मालकीच्या गुरांच्या गाेठयाला आग लागून त्यातील 4 गुरे आगीमध्ये हाेरपळुन मृत्यूमुखी पडली आहेत. तर एक बैल गंभीररित्या जखमी झाला आहे. यामध्ये एक गाभण गाय व एक गाभण म्हैशीचा समावेश हाेता. सदरची घटना हि बुधवारी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, सदर घटनेचा पंचनामा पशुवैदयकिय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या गुरे व गाेठयासहित एक लाखाचे नुकसान त्या शेतकऱ्याचे झाले आहे. नारिंग्रे आयतनवाडी येथील अशोक मर्तुल यांच्या राहत्या घराशेजारीच गुरांचा गाेठा आहे. त्या गाेठयामध्ये एक गाभण गाय, एक गाभण म्हैस, एक रेडा व दाेन बैल अशी एकूण पाच जनावरे हाेती. बुधवारी रात्री 8.30 वा. दरम्याने अचानक गाेठयाला आग लागल्याचे मर्तुल यांच्या आईच्या निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड केली असता वाडीतील सर्व ग्रामस्थ यावेळी त्या ठिकाणी जमा झाले. त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र गाेठयामधील असलेली एक गाभण गाय, एक गाभण म्हैस, एक रेडा व एक बैल अशी चार जनावरे अग्नीच्या भक्षस्थानी सापडून हाेरपळून मृत्यूमुखी पडली तर एक बैल दावण ताेडून गाेठयामधून बाहेर आला. हा बैल जवळजवळ 80टक्के भाजलेला असून गंभीर रित्या जखमी झाला आहे. आग लागल्याचे कारण मात्र अदयापही समजू शकलेले नाही. सदर घटनेची माहिती मिळताच गावचे पाेलिस पाटील संदिप राणे, सरपंच श्रीकांत गावकर, पशुवैदयकिय डाॅ. यांनी गुरुवारी गाेठयाची पाहणी केली. सदर पंचनामा मधील आठ वर्षे वयाची गाभण म्हैशीची किंमत 20 हजार रुपये, गाभण गाय आठ वर्षे वयाची किंमत 20 हजार रुपये, सात वर्षाच्या बैलाची किंमत 20 हजार रुपये व चार वर्षे वयाच्या रेडयाची किंमत 15 हजार रुपये व जखमी अवस्थेत असलेल्या सात वर्षे बैलाची किंमत 15 हजार रुपये व गुरांच्या गाेठयाची दहा हजार रुपये अशी 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामामध्ये नमुद करण्यात आले आहे.
