रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व उपकेंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करा…

शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांची मागणी_

*💫वेंगुर्ले दि.१३-:* वाढत्या कोरोना ला रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना सध्या नागरिकांना जी लस दिली जात आहे, त्याचे योग्य नियोजन करावे तरच गर्दीवर नियंत्रण आणता येईल. रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरणाचे नियोजन आरोग्य विभागाने करावे, अशी मागणी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केली आहे. वेंगुर्ला येथे 26 एप्रिल रोजी तहसीलदार कार्यालयात आमदार दिपक केसरकर यांनी तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना नियंत्रण सोयी सुविधा नियोजन विषयावर तालुका स्तरीय व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा सत्र घेतले होते, त्यावेळी गावपातळीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचे नियोजना संदर्भात चर्चा झाली असता. सभेस उपस्थित तहसिलदार प्रवीण लोकरे तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईनकर ई. अधिकाऱ्यां समोर शिरोडा सरपंच श्री मनोज उगवेकर यांनी पुढील प्रकारे नियोजन केल्यास कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त लोकांना लस चा लाभ मिळवून देऊ शकतो अशी आग्रही मागणी केली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र व अंतर्गत उपकेंद्रे यामध्ये रेडी प्रा आ केंद्र – 5 उपकेंद्रे, तुळस प्रा आ केंद्र – 6 उपकेंद्रे, आडेली प्रा आ केंद्र – 5 उपकेंद्रे आणि परुळे प्रा आ केंद्र – 6 उपकेंद्रे आहेत. आपल्या वेंगुर्ला तालुक्यामध्ये अशा प्रकारे प्रत्येक आरोग्य केंद्रा ची उप केंद्रा मध्ये विभागणी आहे. जवळपास प्रत्येक मुख्य गावात एक तरी उपकेंद्र कार्यान्वित आहे. अशा ठिकाणी लस देण्याचे नियोजन केले तर कमी कालावधीत जास्तीत जास्त लोकांना लसीकरणाचा लाभ मिळवून देता येईल. ज्या ठिकाणी उपकेंद्र ची जागा लहान स्वरूपात असेल तेथील प्राथमिक शाळा ताब्यात घेऊन तिथे लसीकरण होऊ शकते. महत्वाचा विषय आहे तो म्हणजे कुलिंग सिस्टम चा, यावर तोडगा म्हणून सध्या ज्या ठिकाणी कुलिंग सिस्टम ची सोय उपलब्ध आहे तिथून कुलिंग करिअर बॉक्स जे 3 ते 4 तास कुलिंग राहू शकतात अशा बॉक्स मधून लस चा साठा पुरवू शकतो. यावेळी तहसीलदार व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी नियोजन छान असून आपण सदर नियोजन वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच सुरुवात करू असे आश्वासन दिले होते, त्याप्रमाणे काल पासून प्रायोगिक तत्वावर वेंगुर्ला व इतर तालुक्यातील काही प्राथमिक उपकेंद्रांवर लसीकरण करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. यामुळे सर्वांचे आभार मानत असल्याचे सांगून रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या पाच ही उपकेंद्रांवर लवकरात लवकर लसीकरण सुरू करण्यात यावे अशी मागणी श्री. उगवेकर यांनी केली आहे.यासाठी शिरोडा ग्रामकृती समिती व ग्रामपंचायत पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे असे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page