Headlines

Global Maharashtra Breaking News

नगरपालिकेची जागेत २० ऑक्सीजन बेड कोविड सेंटर

५० ऑक्सीजन सिलिंडर, १० कॉन्स्ट्रेक्टर करणार उपलब्ध;आ वैभव नाईक यांचे प्रयत्न *💫मालवण दि.२६-:* मालवण ग्रामीण रुग्णालय नजीक असलेल्या नगरपालिकेच्या जागेत लवकरच 20 ऑक्सिजन बेड कोविड केअर सेंटर तयार केले जाणार आहे. यादृष्टीने आज जिल्हा शल्य चिकित्सक श्री. डॉ. श्रीपाद पाटील यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व बालाजी पाटील यांच्यासोबत या नगरपालिकेच्या जागेची पाहणी देखील केली. आमदार…

Read Full News

शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने देवबाग येथे टँकरद्वारे करण्यात आला पाणीपुरवठा!

तोक्ते वादळामुळे देवबाग येथे पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था! *💫मालवण दि.२६-:* शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने २५ मे रोजी ५००० लिटर पाण्याचा टँकर मार्फत देवबाग येथे पाणी पुरवठा करण्यात आला. तोक्ते वादळामुळे समुद्राचे पाणी विहिरीमध्ये घुसल्याच्या कारणामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला. वादळामुळे समुद्र किनाऱ्यावरील लोकांचे…

Read Full News

डॉ.उत्तम पाटील यांना मुदतवाढ मिळावी…

मंगेश तळवणेकर यांची प्रसिध्दी पत्रकातून मागणी *💫सावंतवाडी दि.२६-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून केली आहे. प्रसिध्दी पत्रकात तळवणेकर म्हणाले, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत…

Read Full News

ज्येष्ठ दशावतारी कलाकार भास्कर सुतार यांचे उपचार दरम्यान निधन…

*💫दोडामार्ग दि.२६-:* दशावतार कलाकार समिती, दोडामार्ग या समितीचे सल्लागार ज्येष्ठ दशावतारी कलाकार भास्कर देऊ सुतार [ वय 61] यांचे बांबोळी गोवा येथे उपचार दरम्यान निधन कोनाळ येथे झालेल्या अपघात त्यांच्या डोकिला जबर दुखापत झाल्याने त्यांना बांबोळी गोवा येथे उपचारासाठी करण्यात आले होते दाखल उपचार दरम्यान मंगळवारी पहाटे 4.15 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मंगळवारी ( दि.25…

Read Full News

भाजप मालवणमध्ये उभारणार ३५ बेडचे कोविड उपचार केंद्र

भाजप नेते नीलेश राणेंनी केली वैद्यकीय अधीक्षक डॉ पाटील यांच्याशी चर्चा *💫मालवण दि.२५-:* सिंधुदुर्गात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध होत नसतानाही शासन आणि सत्ताधारी गप्प आहेत. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांची व्यवस्था होण्यासाठी भाजप विधानपरिषद आमदारांच्या निधीतून मालवण मध्ये ३५ बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप…

Read Full News

दोडामार्ग तालुक्यात घरोघरी शोषखड्डे व आदर्श गाव अभियानाचा शुभारंभ…

जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ *💫दोडामार्ग दि.२५ सुमीत दळवी -:* दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडील महत्वाकांक्षी अभियान “घरोघरी शोषखड्डे व आदर्श गाव याचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते शुभांरंभ करण्यात आला सर्वप्रथम दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे या गावामध्ये शोषखड्डे अभियानाचा शुभांरंभ जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांचे हस्ते श्रीफळ वाढवून…

Read Full News

हिर्लोक-किनलोस गावाची आदर्श गाव योजनेसाठी निवड

जी प सदस्य नागेंद्र परब यानी आपल्या मतदार संघात दिली या गावाला पसंती 💫 *मालवण दि.२५-:* जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी आपल्या मतदार संघातील हिरलोक-किनलोस हा गाव आदर्श गाव योजनेसाठी निवडला असून आज प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन माननीय सरपंच, उपसरपंच,सर्व ग्रा पं सदस्य व ग्रामसेवक यांच्याबरोबर आढावा बैठक घेऊन सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने चर्चा केली….

Read Full News

न्हावेली येथे शोषखड्डे बांधकामाचा शुभारंभ…

जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, न्हावेली सरपंच प्रतिभा गावडे यांच्या हस्ते शुभारंभ_ *💫सावंतवाडी दि.२५-:* न्हावेली ग्रामपंचायतच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्हा परिषद आदर्श गाव या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता मी समृद्ध गाव ही संकल्पना राबविण्याच्या दृष्टिकोनातून शोषखड्डे बांधकामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक व न्हावेली सरपंच प्रतिभा गावडे यांच्या हस्ते…

Read Full News

आ केसरकरांकडून दोडामार्ग कोविड सेंटरला १० ऑक्सीजन फ्लो मिटर

अजुन दहा फ्लो मीटर देणार गणेशप्रसाद गवस यांची माहिती *💫दोडामार्ग दि.२५ सुमित दळवी-:* दोडामार्ग कोविड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन बेडची गरज लक्षात घेवून आमदार दीपक केसरकर यांनी आज दहा ऑक्सिजन फ्लो मीटर दिले. शिवसेनेचे जिल्हा संघटक गणेशप्रसाद गवस यांनी ते फ्लो मीटर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवळे यांच्याकडे सुपूर्द केले.तसेच श्री….

Read Full News

कोनाळ येथे मग्रारोहयो अंतर्गत जलशक्ती अभियान व जि.प.आदर्श गाव मोहीमेचा शुभारंभ…

*💫दोडामार्ग दि.२५-:* महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रअंतर्गत जलशक्ती अभियान व जिल्हा परीषद आदर्श गाव योजनेचा शुभारंभ आज कोनाळ ग्रामपंचायत हद्दीत सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती डॉ.अनिषा दळवी व दोडामार्ग पंचायत समिती सदस्य श्री.लक्ष्मण नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी कोरोना निर्बंधामुळे सद्यस्थितीत दळणवळण तसेच इतर बाबी बंद असल्यामुळे कामगारांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page