ज्येष्ठ दशावतारी कलाकार भास्कर सुतार यांचे उपचार दरम्यान निधन…

*💫दोडामार्ग दि.२६-:* दशावतार कलाकार समिती, दोडामार्ग या समितीचे सल्लागार ज्येष्ठ दशावतारी कलाकार भास्कर देऊ सुतार [ वय 61] यांचे बांबोळी गोवा येथे उपचार दरम्यान निधन कोनाळ येथे झालेल्या अपघात त्यांच्या डोकिला जबर दुखापत झाल्याने त्यांना बांबोळी गोवा येथे उपचारासाठी करण्यात आले होते दाखल उपचार दरम्यान मंगळवारी पहाटे 4.15 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मंगळवारी ( दि.25 मे ) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भास्कर देऊ सुतार हे कामा निमित्त पिकुळे येथील काम आटपून तिलारीला  आपल्या दुचाकीवरून जात असताना दुचाकीवरचा ताबा सुटून  कोनाळ याठिकाणी त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन त्यांच्या डोकीला जबर दुखापत झाली असल्याने त्यांना  बांबोळी गोवा येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बांबोळी गोवा येथे त्यांच्या औषधोपचार सुरू असताना मंगळवारी रात्री पहाटे 4.15 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पच्छात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. दशावतार कलाकार समिती,दोडामार्ग स्थापन करण्यात आली त्यात त्यांचे मोलाचे सहकार्य होते. दोडामार्ग तालुक्या बरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा राज्यात उत्कृष्ट स्त्री अभिनय सादर करणारे दशावतारी कलाकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. आणि त्याच बरोबर समितीचे सल्लागार म्हणून ते कार्यरत होते. दशावतारी कलेला आपलं पूर्ण आयुष्य त्यांनी घालविले. त्यांच्या जाण्याने दशावतारी कलाक्षत्रेत आणि दशावतार कलाकार समिती, दोडामार्ग या समितीमध्ये कधीही भरून न येणारी अशी पोकळी निर्माण झाली आहे.

You cannot copy content of this page