डॉ.उत्तम पाटील यांना मुदतवाढ मिळावी…

मंगेश तळवणेकर यांची प्रसिध्दी पत्रकातून मागणी

*💫सावंतवाडी दि.२६-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून केली आहे. प्रसिध्दी पत्रकात तळवणेकर म्हणाले, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत खोत या दोघांचीही ३१ मे ला मुदत संपणार आहे. त्यांच्या उत्तम कार्याची आठवण सर्वांना नेहमीच असेल. खोत यांच्या खात्यांतर्गत सेवा वाढवून मिळत नाही. याआधी सुनील धनावडे यांनी देखील सावंतवाडी पोलीस निरीक्षक म्हणून अतिशय चांगले काम केले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत शशिकांत खोत यांनीही चांगले काम केले. दोन वर्षांपूर्वी डॉ. उत्तम पाटील यांची गरज लक्षात घेऊन तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना मुदत वाढ दिली होती, त्यानंतरही त्यांनी अतिशय चांगले काम केले होते. कर्मचारी, राजकारणी, रुग्णांचे नातेवाईक यांच्यावर परिस्थिती नुसार रागावले देखील; रात्री अपरात्री कोणाला कसलाही त्रास असला तरी ते स्वतः जातिनिशी लक्ष घालून सर्व व्यवस्था करायचे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी रात्री एका महिला भगिनीला रक्ताची गरज होती, त्याबाबत देखील रात्रीच्या वेळी स्वतः जातिनिशी लक्ष घालत रात्री एक वाजेपर्यंत जागे राहात रक्त उपलब्धीसाठी प्रयत्न केले होते” अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली होती, यावेळी उपस्थितांनी डॉ. उत्तम पाटील यांच्या मुदतवाढी संदर्भात हिरवा कंदील दाखवला होता. आमदार दीपक केसरकर हे सुद्धा या बाबत नक्कीच सकारात्मक विचार करून निर्णय घेतील असा विश्वास असल्याचे तळवणेकर यांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page