शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने देवबाग येथे टँकरद्वारे करण्यात आला पाणीपुरवठा!

तोक्ते वादळामुळे देवबाग येथे पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था!

*💫मालवण दि.२६-:* शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने २५ मे रोजी ५००० लिटर पाण्याचा टँकर मार्फत देवबाग येथे पाणी पुरवठा करण्यात आला. तोक्ते वादळामुळे समुद्राचे पाणी विहिरीमध्ये घुसल्याच्या कारणामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला. वादळामुळे समुद्र किनाऱ्यावरील लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासकीय मदत बऱ्याच जणांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कोकणातील सामाजिक संघटना तसेच दानशूर व्यक्तीने एक पाऊल पुढे येउन ज्यांची आर्थिक दृष्टीने बिकट अवस्था असून खूप नुकसान झालेल्या लोकांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आले. या उपक्रमाच्यावेळी अनिश सावंत, प्रतीक कुबल, लकी सावंत, नितीन सोलकर, महेश अडसुळे, रमाकांत नाईक उपस्थित होते.

You cannot copy content of this page