नगरपालिकेची जागेत २० ऑक्सीजन बेड कोविड सेंटर

५० ऑक्सीजन सिलिंडर, १० कॉन्स्ट्रेक्टर करणार उपलब्ध;आ वैभव नाईक यांचे प्रयत्न

*💫मालवण दि.२६-:* मालवण ग्रामीण रुग्णालय नजीक असलेल्या नगरपालिकेच्या जागेत लवकरच 20 ऑक्सिजन बेड कोविड केअर सेंटर तयार केले जाणार आहे. यादृष्टीने आज जिल्हा शल्य चिकित्सक श्री. डॉ. श्रीपाद पाटील यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व बालाजी पाटील यांच्यासोबत या नगरपालिकेच्या जागेची पाहणी देखील केली. आमदार वैभव नाईक यांनी काल च मालवण ग्रामीण रुग्णालय ला भेट देऊन याबाबत तात्काळ आदेश काढण्या बाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना सूचना केली होती. याप्रमाणे केलेल्या मागणीनुसार मालवण ग्रामीण रुग्णालय नजीक च्या जागेत 20 ऑक्सिजन बेड कोविड केअर सेंटर चालू करण्यात येणार असून याठिकाणी 50 ऑक्सिजन सिलिंडर, 10 काँसेंट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्याकरिता ग्रामीण रुग्णालय नजीक असलेल्या जागेत ऑक्सिजन बेड असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या कडे मागणी केली होती. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांना देखील याबाबत बैठक घेऊन तात्काळ कोविड केअर सेंटर चालू करण्याबाबत सूचना केल्या होत्या. यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक यांनी 20 बेड चे कोविड केअर सेंटर चालू करण्याबाबत व याठिकाणी 50 ऑक्सिजन सिलिंडर, 10 काँसेंट्रेटर उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या आहेत..

You cannot copy content of this page