हिर्लोक-किनलोस गावाची आदर्श गाव योजनेसाठी निवड

जी प सदस्य नागेंद्र परब यानी आपल्या मतदार संघात दिली या गावाला पसंती

💫 *मालवण दि.२५-:* जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी आपल्या मतदार संघातील हिरलोक-किनलोस हा गाव आदर्श गाव योजनेसाठी निवडला असून आज प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन माननीय सरपंच, उपसरपंच,सर्व ग्रा पं सदस्य व ग्रामसेवक यांच्याबरोबर आढावा बैठक घेऊन सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने चर्चा केली. या कामाची सुरुवात हिरलोक गावामध्ये शोषखड्यांचा शुभारंभ करून योजनेच्या कामकाजाची सर्वप्रथम मुहुर्तमेढ रोवली.या वेळी गावाच्या सरपंच कु. कन्याश्री मेस्त्री,उप सरपंच नरेंद्र राणे,पंचायत समिती कुडाळ विस्तार अधिकारी श्री.खरात साहेब,सर्व ग्रा प सदस्य,हिरलोक शाखा प्रमुख चंद्रकांत सावंत व हिरलोक किनलोस ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page