जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, न्हावेली सरपंच प्रतिभा गावडे यांच्या हस्ते शुभारंभ_
*💫सावंतवाडी दि.२५-:* न्हावेली ग्रामपंचायतच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्हा परिषद आदर्श गाव या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता मी समृद्ध गाव ही संकल्पना राबविण्याच्या दृष्टिकोनातून शोषखड्डे बांधकामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक व न्हावेली सरपंच प्रतिभा गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शरद धाऊसकर, विस्तार अधिकारी गणपत लोंढे, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राजन मुळीक यांनी गावात शंभर टक्के शोषखड्डे पुर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.
