आ केसरकरांकडून दोडामार्ग कोविड सेंटरला १० ऑक्सीजन फ्लो मिटर

अजुन दहा फ्लो मीटर देणार गणेशप्रसाद गवस यांची माहिती

*💫दोडामार्ग दि.२५ सुमित दळवी-:* दोडामार्ग कोविड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन बेडची गरज लक्षात घेवून आमदार दीपक केसरकर यांनी आज दहा ऑक्सिजन फ्लो मीटर दिले. शिवसेनेचे जिल्हा संघटक गणेशप्रसाद गवस यांनी ते फ्लो मीटर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवळे यांच्याकडे सुपूर्द केले.तसेच श्री. केसरकर कोविड सेंटरला आणखी दहा ऑक्सिजन सिलेंडर देणार असल्याचेही श्री.गवस यांनी सांगितले. यावेळी डॉ. रामदास रेडकर,युवासेनेचे तालुका उपप्रमुख भगवान गवस, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख आनंद रेडकर, चंदन गावकर, लवू मिरकर, प्रणय मोरजकर, झरेबांबर सरपंच स्नेहा गवस, संजय गवस आदी उपस्थित होते. कोविड केअर सेंटरमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातील काहींना ऑक्सिजन बेडची गरज पडते.कोविड केअर सेंटरमध्ये २४ सिलेंडर होते;पण ते कार्यान्वित करण्यासाठी ऑक्सिजन फ्लो मीटरची गरज होती. त्याबाबत डॉ. ऐवळे यांनी पत्रकारांना चर्चेसाठी बोलावून दात्यांना आवाहन करण्याची विनंती केली होती. पत्रकारांनी त्याबाबत आवाहन करताच तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील व्यक्तींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पत्रकार प्रभाकर धुरी,तेजस देसाई,सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी पुढाकार घेतला.त्याला दात्यांनी प्रतिसाद देऊन आतापर्यंत २० फ्लोमीटर भेट दिले. अजूनही अनेकजण फ्लो मीटर, पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर,सॅनिटायझर,ग्लोव्ज देणार आहेत. तालुक्यातील कोविड बाधित रुग्णांना उत्तम सेवा सुविधा मिळाव्यात आणि सर्वजण उपचारानंतर कोरोनामुक्त व्हावेत यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. तालुक्यातील आणखी दात्यांनीही त्यासाठी पुढे यावे असे आवाहन डॉ.ऐवळे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page