जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
*💫दोडामार्ग दि.२५ सुमीत दळवी -:* दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडील महत्वाकांक्षी अभियान “घरोघरी शोषखड्डे व आदर्श गाव याचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते शुभांरंभ करण्यात आला सर्वप्रथम दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे या गावामध्ये शोषखड्डे अभियानाचा शुभांरंभ जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, योजनेचे समन्वयक श्री ठाकूर, उपअभियंता यांत्रीकी श्री पुरंदरे, पिकुळे गावचे सरपंच श्रीमती महालकर व उपसरपंच उपस्थित होते. सदर कार्यक्रमादवारे शोषखड्डे अभियान अंतर्गत कोरोना काळात स्थानिक लोकांना रोजगार, जमिनीमध्ये पाणी जिरविणे जेणेकरुन जमीनीतील पाण्याचा साठ्यात वाढ होईल व सांडपाणी व्यवस्थापन हे तिहेरी उद्देश साध्य होणार असून जिल्ह्यातील जनतेने घरोघरी शोषखड्डेचे ध्येय ठेऊन किमान एक लाखाचे उद्दिष्ट साध्य करावे असे आवाहन संजना सावंत यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिकुळे ग्रामपंचायतलाही त्यांनी भेट दिली. यावेळी पिकुळे सरपंच यांनी ग्रामपंचायत इमारतीकरीता जिल्हा परिषदच्या मालकीच्या जमीनीमधून ५ गुंठे जागा मिळण्याकरीता विनंती केली यावेळी त्यांनी तसा ग्रामपंचायत ठराव घेऊन मागणीपत्र सादर करण्याचे आदेश सरपंच यांना दिले. त्यानंतर दोडामार्ग तालुक्यातील विर्डी या गावी पुढील शोषखड्डे कार्यक्रमाचा शुभारंभही संजना सावंत यांचे हस्ते करण्यात आला.
