Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी ५७४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २३ हजार ३३६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार ६९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५७४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

वेताळ प्रतिष्ठानच्या तर्फे तुळस येथे आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप…

*💫वेंगुर्ला दि.०७-:* सिंधुदुर्ग जिल्हा सद्यस्थितीत कोरोना प्रदूर्भावाच्या वाढत्या प्रभावामुळे रेड झोन मध्ये आहे. जिल्ह्यातील गावागावात रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. यास तुळस गावहि अपवाद नाही, गावात रुग्णसंख्या नव्याने वाढताना दिसते. कोरोना आजारावर उपचारापेक्षा प्रतिबंध बरा यासाठी प्रतिष्ठाने यापूर्वीही जनजागृतीपर अनेक उपक्रम राबवून ग्रामस्थांमध्ये प्रबोधन करण्यात आले. यावेळीं तुळस गावातील प्रत्येक कुटुंबासाठी *आर्सेनिक…

Read Full News

जिल्ह्यात १० व ११ जूनला पावसाची शक्यता

हवामान खात्याचा अंदाज *💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १० व ११ जुन रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने वर्तवला असून, नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष , जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Read Full News

जिल्ह्यातील आदर्शवत कोविड सेंटर म्हणून खारेपाटणची ओळख निर्माण करा…

खारेपाटण कोविड सेंटरचे प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केले लोकार्पण *💫कणकवली दि.०७-:* कोरोना या संकटाने आरोग्य यंत्रणेचे महत्त्व आणि गरज काय हे दाखवून दिली आहे.त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी आरोग्य मंदिरांना सढल हस्ते दान देऊन मदत केली पाहिजे. असे उदगार कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी खारेपाटण येथील कोविड केअर सेंटरच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी काढले. जिल्ह्यातील एक आदर्शवत…

Read Full News

*बांदा ग्रामपंचायतीला सुसज्ज रुग्णवाहिका प्रदान

जिल्हा खनिकर्म विभागाच्या निधीतून प्राप्त *सिंदुर्गनगरी दि.०७-:* बांदा ग्रामपंचायतीला जिल्हा खनिकर्म विभागाच्या निधीतून सुसज्ज अशी रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. या रुग्णवाहिकेचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उन्नती धुरी, सभापती शर्वाणी गावकर, महेंद्र चव्हाण, राजन म्हापसेकर, रणजित देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान ही रुग्णवाहिका…

Read Full News

शिवस्वराज्य गुढीची विटंबना केलेल्या व्यक्तीवर शासनाने येत्या आठ दिवसात गुन्हा दाखला करावा…_

सकल मराठा समाजाच्यावतीने तहसीलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी,पोलीस निरीक्षक यांना निवेदन *💫कुडाळ दि.०७-:* तालुक्यातील ग्रामपंचायत हुमरमळा (वालावल) यांनी घालून दिलेल्या निर्देशाचे पालन न करता त्या ठिकाणी उपस्थित असलेले अतुल बंगे, सरपंच अर्चना अतुल बंगे, ग्रामसेवक अर्पणा पाटील यांनी स्वतः च्या पायात बूट घालून “शिवस्वराज्य” गुढीची विटंबना केली आहे तरी ह्या व्यक्तीवर शासनाने येत्या आठ दिवसात कार्यवाही…

Read Full News

*ग्राम विलगी करण कक्षावर व्यवस्थापक म्हणून शिक्षकांची नेमणूक करू नका

*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी *💫मालवन दि.०७-:* कोविड -१९ साठीच्या अनुषंगाने संस्थात्मक विलगीकरण केंद्रामध्ये व्यवस्थापक म्हणून शिक्षकांना नियुक्त करण्याचे आदेश जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेले आहे. तरी ग्रामविलगीकरण कक्ष व्यवस्थापन ड्युटीवर शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येऊ नये अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने जिल्हाध्यक्ष…

Read Full News

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात कणकवली पेट्रोलपंपासमोर काँग्रेसने छेडले आंदोलन

कोरोना साथ ओसरल्यावर मोठे आंदोलन ऊभारणार:प्रदीप मांजरेकर *💫कणकवली दि.०७-:* केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. आज आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 64 डाँलर प्रती बँरल एवढ्या कमी असतानाही पेट्रोल डिझेलचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत मोदी सरकार हे सामान्य जनतेचे नसुन ते फक्त मुठभर धनदांडग्या ऊद्योगपतींसाठी काम करत आहे . असे…

Read Full News

तौक्ते चक्रीवादळळात नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना बाळ सरजोशी चँरीटेबल ट्रस्टच्यावतीने १५० आंबा कलमांचे वाटप

ट्रस्टचे अध्यक्ष निलेश सरजोशी यांच्या हस्ते वाटप *💫मालवण दि.०७-:* तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून आचरे पंचक्रोशीत मोठया प्रमाणावर आंबा कलमाचे नुकसान झाल्याने संकटात सापडलेल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांना बाळ सरजोशी चँरीटेबल ट्रस्ट आचरे यांच्यावतीने १५० आंबा कलमांचे वाटप ट्रस्ट चे अध्यक्ष निलेश सरजोशी यांच्या हस्ते करण्यात आले तौक्ते चक्रीवादळात आचरे गावातीळ काही फळधारणा होणारी आंबा कलमे उन्मळून…

Read Full News

*मालवण तालुका काँग्रेसच्यावतीने इंधन दरवाढी विरोधात निदर्शने

मोदी सरकारविरुद्ध घोषणा देत नोंदवला तीव्र निषेध* मालवण (प्रतिनिधी) लुटेरी मोदी सरकार पेट्रोल हुआ सौ पार, मोदी सरकार हाय हाय… अशा घोषणा देत मालवण तालुका काँग्रेसच्या वतीने आज मालवण पेट्रोल पंप समोर इंधन दरवाढी विरोधात निदर्शने करून मोदी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, युवक…

Read Full News

You cannot copy content of this page