मला अँक्टर म्हणणारे मोठे अँक्टर; राजन तेली यांचा पलटवार*
*💫सावंतवाडी दि.१४-* जिल्ह्यातील ७० पैकी ६० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच ते यावेळी म्हणाले की, भाजपची जिल्ह्यातील ताकद वाढल्याने आज शिवसेनेचे खासदार, पालकमंत्री, माजी पालकमंत्री असे नेते आज ग्रामपंचायतीच्या प्रचारात उतरले आहेत. मात्र भाजपची ताकद वाढल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने आता शिवसेने नेते आज सर्व मैदानात उतरले आहेत. तसेच ग्रामीण भागात आज महाविकास आघाडी बाबत प्रचंड नाराजी आहे. भात शेतीची नुकसान, चक्रीवादळ नुकसान भरपाईचे अद्याप देखील मिळाली नाही आहेत. तसेच माझ्यावर अँक्टर म्हणून टीका करणारेच मोठे अँक्टर असून निवडणुकीच्या वेळी त्यांनी एक्टिंग करूनच निवडून आले असल्याचा पलटवार केला आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधिर आडीवरेकर, दिलीप भालेकर, मोहिनी मडगावकर आदी उपस्थित होते.
