माजी पालकमंत्र्यांचा प्रचार म्हणजेच भाजपाचे यश

महेश धुरी यांचा दीपक केसरकर यांना टोला;सावंतवाडी तालुक्यात ग्रा.पं.निवडणुकीचा प्रचार

*💫बांदा दि.१४-:* ग्रामपंचायत निवडणुका ह्या स्थानिकांनी स्वबळावर एकोप्याने लढवायच्या असतात असे नेहमी सांगणारे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार गावागावातील वाडीवार करत आहेत. भाजपच्या विजयाच्या धास्तीने स्वतः आमदारांना प्रचार यंत्रणेची धुरा सांभाळावी लागली हेच भाजपाचे यश असल्याचे टोला, बांदा मंडळ भाजपा तालुकाध्यक्ष महेश धुरी यांनी आपली प्रतिक्रिया देताना लगावला. मुंबईतील बडे नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रा.पं.निवडणुकीच्या प्रचारात येऊन तबावतंत्र वापरत असल्याचे सांगत आहेत. मात्र ज्या ग्रामीण भागाने विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांना भरपूर मतांनी विजयी करून आणले अशा ग्रामीण भागाला कोरोना काळात वाऱ्यावर सोडून स्वतः मात्र मुंबईत बसले. ग्रामीण भागाच्या विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून जनतेला आश्वासने देण्यापलिकडे काहीच केले नाही. त्यामुळे जनतेने अशा आश्वासनांना बळी न पडता गावाचा विकास करेल अशाच उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचे आवाहन महेश धुरी यांनी केले आहे.  जनतेच्या, शेतकऱ्यांच्या भावना जाणण्यात आमदार केसरकर अपयशी ठरले आहेत. अतिवृष्टी, चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानीची काही शेतकऱ्यांना अजूनही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी सर्वसामान्य नागरिकांचे नसून फक्त घोषणाबाजी करणारे सरकार असल्याचा आरोप बांदा मंडळ भाजपा तालुकाध्यक्ष महेश धुरी यांनी यावेळी केला.

You cannot copy content of this page